काळ्या साड्या परिधान निषेध

0

महासभेत महापौरांच्या आसनासमोर लोटा घेऊन निदर्शने

पिंपरी : महापालिकेतर्फे आकारला जाणारा शास्तीकर रद्द करावा. शास्तीबाबत राज्य सरकारचा निर्णय येत नाही, तोपर्यंत शास्ती कर वसूल न करता सामान्य कर स्वीकारण्यात यावा. अशी मागणी करीत राष्ट्रवादीच्या नगरसेविकांनी ‘काळीसाडी’ परिधान करुन निषेध व्यक्त केला तर हातात तांब्या घेऊन महासभेत महापौरांच्या आसनासमोर पाणीपट्टी दरवाढीचा विरोध केला.

अनधिकृत बांधकामे नियमित करावीत, महापालिकेने केलेली पाणीपट्टी दरवाढ आणि रिंग रोड रद्द करण्यात यावा. प्रस्तावित पाणीपट्टी लाभ कर मागील वर्षीप्रमाणे ठेवावा. तसेच पवना जलवाहिनी व 24 बाय 7 पाणीपुरवठा योजना त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी केली होती.