अमळनेर। तालुक्यातील कावपिंप्री येथे गो-क्षेत्र प्रतिष्ठान संचलीत तिसर्या गो-शाळेचे भूमिपूजन आज शनिवारी 27 रोजी करण्यात येणार आहे. गोकृपा कथा आणि तपदर्शन महोस्तवाचे देखील यावेळी आयोजन करण्यात आले आहे. सायं 5.30 वा भुमिपूजन होणार आहे. कावपिंप्री येथे गेल्या 6 महिन्यापासून क्षेत्राची समृद्धी, लोककल्याण, गोरक्षा, गोशाळा भूमीची सिद्धी करण्यासाठी अखंड तप सुरु आहे.
राजस्थानचे तपस्वी संत अन्न ग्रहण करीत नाहीत, गाडी-वाहनात बसत नाहीत, पादुका किंवा चप्पल घालत नाहीत, कोणाकडून दान भेट अथवा दक्षिणा घेत नाहीत, धन-पैशाला हात लावत नाहीत, संपूर्ण भारत भ्रमण करीत असतात. कावपिंप्रीस्थित तपस्थळी राहून अमळनेर परिसरात गोरक्षा व्हावी म्हणून तसेच लोकांचे जीवन सुखमय व्हावे यासाठी ते तप करीत आहेत. 27 रोजी त्यांची तपस्या तपस्येचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. भुमिपूजनानंतर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. लाभ घेण्याचे आवाहन गो-क्षेत्र प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.