हाजिरा । नवाझ शरीफ सरकार आणि पाकिस्तानच्या लष्कराविरोधात आणि आझादीच्या घोषणा पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक लोकांनी देण्यात आल्याने तेथील जनतेने पाकिस्तानच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. पाकव्याप्त काश्मीरातले नेते लियाकत हयात खान यांनी यात पुढाकार घेत पाकिस्तानचे राजकीय पक्ष आणि लष्करी नेतृत्वाविरुद्ध एका व्यापक आंदोलनाला या भागात सुरूवात झाली असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानच्या अत्याचाराचा कहर झाला आहे आणि आता तेथील स्थानिक लोक पाकिस्तानातून येणार्या अतिरेक्यांना हुसकावून लावतील. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि पंतप्रधान नवाझ शरीफ यांना हे निक्षून सांगत आहोत की पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी पाठवणे बंद करा.
– लियाकत हयात खान, पाकव्याप्त काश्मीरातले नेते