नवी दिल्ली । काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी जम्मू आणि काश्मीरमधील अशांत वातावरणाला केंद्र शासनाला जबाबदार ठरवले आहे. काश्मिरातील जनता सध्या केंद्र सरकार आणि आतंकवादी यांच्या अतिरेकामध्ये अडकली आहे, असा गंभीर आरोप त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे.
चिदंबरम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, काश्मीर खोर्यात सध्या तेथील लोक दुहेरी परिस्थितीला सामोरे जात आहेत. एका बाजुला केंद्र सरकार त्यांच्या धोरणाचा अतिरेक करत आहेत, ज्यामुळे खोर्यात मोठी समस्या निर्माण झाली आहेत, तर दुसरीकडे अतिरेकी संघटना त्यांच्या आतंकवाद कायम ठेवत आहेत, ज्याच्यावर लवकरच तोडगा काढणे अपेक्षित आहे, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
काश्मीरची समस्या जटील
या ठिकाणीची जनता केंद्र आणि आतंकवादी संघटना यांच्यातील अतिरेकामध्ये अडकली आहे, या परिस्थितीचा परिणाम म्हणून खोर्यातील जनतेला पर्यायाने राज्याला भोगावा लागत आहे. आपण याआधीही अनेकदा इशारा दिला होता की, काश्मीरची समस्या जटील बनत चालली आहे. चिदंमबरम यांनी हा ट्वीट जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि केंद्री गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतल्यानंतर केला.