श्रीनगर: कलम ३७० रद्द करण्यापूर्वी जम्मू-काश्मिरातील अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अनेक पक्षांचे नेते अजूनही अटकेत आहेत. दोन माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा जावेदने एक ऑडिओ मेसेज रिलीज केला असून, आपल्याला ताब्यात घेण्यात आले असून घरात बंदिस्त ठेवण्यात आले असल्याची माहिती दिली आहे. तसेच आपण जर पुन्हा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी देण्यात आल्याचेही म्हटले आहे. इल्तिजाने आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले असल्याची माहिती दिली आहे.
अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात ‘आज जेव्हा देशभरात सगळीकडे स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे, काश्मिरींना जनावरांप्रमाणे कैद करुन ठेवण्यात आले आहे. त्यांना मुलभूत मानवाधिकारांपासून वंचित ठेवले जात आहे’ असे म्हटले आहे.