काश्मीरमधील काही भागातील आफ्स्पा रद्द करण्याची मुफ्तींची मागणी

0

श्रीनगर । काश्मीरमधील काही भागात सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा अर्थात आफ्स्पा रद्द करण्याचे आवाहन जम्मू काश्मिरच्या मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी केले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे आफ्स्पा रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यास काय हरकत आहे, असा सवाल त्यांनी केला. नवी दिल्लीत झालेल्या दहशतवाद विरोधी परिषदेत त्या बोलत होत्या.

जेव्हा काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती तेव्हा आम्ही या कायद्याचा वापर करण्यास चाचरलो नाही.
अधिक सैन्य बळ तैनात करण्याचा निर्णयही घेतला. परंतु आता जर परिस्थिती सुधारत आहे तर एक एक करून सर्व ठिकाणी लागू असलेला आफ्स्पा रद्द करण्यातबाबतचा निर्णय घेण्यास काय हरकत आहे, असे त्या म्हणाल्या. दहशतवाद निर्मूलनासाठी सुशासन आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या. राज्यात सुशासन आणण्यासाठी व दहशतवादाचे निर्मूलन करण्यासाठी शांततेची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांच्या धोरणाची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.