काश्मीरमधील कोणत्याही कारवायांना उत्तर देण्यासाठी आपण पूर्ण सक्षम – लष्करप्रमुख

0

नवी दिल्ली : काश्मीरमधील कोणत्याही कारवायांना उत्तर देण्यासाठी आपण पूर्ण सक्षम आहोत. त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबत आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही, याची चांगली माहिती आहे. असे असे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी म्हटले आहे.

इन्फट्री दिनानिमित्त आज २७ ऑक्टोबर रोजी लष्करप्रमुखांनी दिल्लीतील इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती स्मारकाला भेट दिली आणि शहीदांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. दगडफेक करणाऱ्यांच्या हल्ल्यात ज्या जवानाने आपला जीव गमावला तो लष्करासाठी रस्ते बांधण्याचे काम करणाऱ्या बॉर्डर रोड टीममध्ये कार्यरत होता. मात्र, आपल्या जवानाचा जीव गेल्यानंतरही आपल्याकडे काही लोक बोलतात की दगडफेक करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊ नका, हे दुर्देवी असल्याचेही लष्कर प्रमुख रावत यांनी म्हटले आहे.