श्रीनगर : गुरुवारी पहाटे जम्मू-काश्मीरमधील दोडा येथील थाटरी गावात झालेल्या ढगफुटीमुळे सहा जणांचा मृत्यू झाला. गावातील घरे, दुकाने वाहून गेली. तर अनेक लोक बेपत्ता झाले असून पोलिस तसेच एसडीआरएफचे या नागरिकांचा शोध घेत आहेत.
गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दोडा येथील थाटरी भावात ढगफुटी झाली. यात 6 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. मातीच्या ढिगार्याखाली अनेकजण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती बचाव पथकाने व्यक्त केली आहे. बचाव पथकाला एका कुटुंबातील 5 सदस्यांसह 8 जणांना वाचवण्यात यश आले.