श्रीनगर : कटरा क्रॉसिंग राष्ट्रीय महामार्गाजवळ पोलिसांनी संशयावरून एका ट्रकची झडती घेतली. एके ४७ रायफल आणि ३ मॅगझीन पोलिसांनी एका ट्रकचा पाठलाग करत जप्त केले. या ट्रकचा चालक आणि वाहकाला ताब्यात घेण्यात आले. आणि ट्रकमधून पळालेल्या २ ते ३ संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.याबाबत ट्रकच्या चालक आणि वाहकाला ताब्यात घेउन चैाकशी सुरू आहे.
काश्मीरी जनता दहशतवादामुळे त्रस्त झाली आहे. दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. सुरक्षा दलांनी राज्याला दहशतवादमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.