श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी हंदवाड्यातील मगम परिसरात दहशतवादी लपून बसलेल्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे असून, ते पाकिस्तानचे आहेत. दहशतवादी लपलेल्या परिसराला सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली असता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनीही दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी ही माहिती दिली. गेल्या आठवड्यातही सुरक्षा दलांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार झाकिर उर रहमान लख्वी याच्या पुतण्यासह लष्कर-ए-तोयबाच्या सहा दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले होते.