काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आक झालेल्या चकमकीत दोन दहशतवद्याना भारतीय सुरक्षा रक्षक दलाने एन्काऊन्टरमध्ये कंठस्नान घातले आहे. हे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याचं सांगण्यात येत आहे. संगम भागात झालेल्या या चकमकीत सुरक्षादलानं दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला. भयंकर दहशतवादी कृत्य घडवून आणण्याच्या प्रयत्नात हे दहशतवादी असल्याचे यातून समोर आले आहे.

हे दहशतवादी लष्कर ए तोयबाचे सदस्य असल्याचं सांगण्यात आले. ‘सीआरपीएफ’चं सर्च ऑपरेशन सुरू असताना संगम भागात दहशतवादी लपून बसल्याची सूचना त्यांना मिळाली होती. यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. प्रत्यूत्तरादाखल सुरक्षादलानंही त्यांच्यावर गोळीबार केला. या चकमकीत लष्करचे दोन दहशतवादी मारले गेले.

यापूर्वी, जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केलीय. गुप्त सूचनेच्या आधारे मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील खान साहेब भागात चौकशीसाठी एक चौकी उभारण्यात आली होती. याद्वारे एका वाहनाला रोखण्यात आलं. यावेळी, साकिब अहमद लोन याला आक्षेपार्ह सामानासह अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिलीय.