काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला यश; ४ दहशतवादी ठार

0

श्रीनगरः काश्मीरमध्ये आज सुरक्षा रक्षकांना आज मोठे यश मिळाले. अनंतनाग जिल्ह्यात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी मिळून ही कारवाई केली.

अनंतनाग जिल्ह्यातील दियालगाम गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात ४ दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. जवानांनी संपूर्ण भागाची नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू आहे.