काश्मीरमध्ये ३ दहशतवादी ठार; चार एके ४७ जप्त

0

श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यातील बोनिआर परिसरात, एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांना लष्कराने ठार केले आहे. लष्कराने त्यांच्याकडील ४ एके ४७ ही जप्त केले आहेत. दरम्यान या परिसरात लपलेल्या अजूनही काही दहशतवाद्यांचा लष्कराकडून शोध सुरू आहे.

सुरक्षा दलांना बोनिआर परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी लष्काराने हा परिसर घेरून एलओसी जवळ लपलेल्या तीन दहशतवाद्यांना ठार केलं. काश्मीरमध्ये आता २५० तळांवर एकूण ३०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी भारतीय सैनिकांनी मोहीम उघडली असून सीमेपलीकडून दहशतवादी भारतात येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.