काश्मीरातील पुलवामा जिल्ह्यात तीन दहशतवादी ठार

0

श्रीनगर : काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना मोठं यश प्राप्त झालं असून झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याला कंठस्नान घालण्यात आलंय. या चकमकीत हिजबुलचे एकूण तीन दहशतवादी ठार झालेत. पण यात एक जवान शहीद झाला आहे.

सुरक्षा दलांना दहशतवादी लपून बसल्याची माहिती पहाटे मिळाली होती. या माहितीत दोन ते तीन दहशतवादी लपल्याचं कळलं. यानंतर कारवाई करत जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. अनेक तास चाललेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जहूर ठोकर याचाही समावेश आहे. दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी जहूर हा टेरिटोरियल आर्मीत होता. या चकमकीत एक जवानही शहीद झाला. या चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम राबवली आहे. तर चकमकीवेळी स्थानिक नागरिक आणि जवानांमध्ये झटापट झाली. यात काही नागरिक जखमी झाले आहेत.