काश्मीरात जिवंत दहशतवादी पकडला

0

चकमकीत एक ठार तर दुसर्‍याने केले आत्मसमर्पण

श्रीनगर । जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले असून एकाला शस्त्रासह अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आदिल असे असून तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामिल होता. आदिल शोपियांन जिल्ह्यातील चिटीपोरामध्ये राहणारा आहे.

महत्वाची माहिती मिळणार
शनिवारी रात्री, शोपियानमधील इमाम परिसरातील एका घरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसराला सुरक्षा दलाच्या जवानांनी घेरल्यानंतर एका घरातून अचानक गोळीबार सुरू झाला. प्रत्युत्तरात जवानांनी गोळीबार केला. चकमकीत घेरल्यानंतर एका दहशतवाद्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. चकमकीच्या ठिकाणाहून एका दहशतवाद्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून तारीक अहमद असे त्याचे नाव आहे. दरम्यान, पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून अतिशय महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. यामुळे त्याची अटक महत्वाची मानली जात आहे.