काश्मीर आणि कट्टरतावाद

0

1980 च्या दशकात अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्याविरुद्ध धार्मिक लढा निर्माण झाला. त्यावेळी पाकमध्ये अब्दुल्ला आझम या सौदी धर्मगुरूने या जिहादला नैतिक बळ देण्यासाठी वहाब्बी इस्लामचा प्रसार केला. जगभरातून अमेरिका आणि सौदीने दहशतवादी गोळा केले. या धर्मयुद्धातून इस्लामिक कट्टरवादाचा पाया रोवला गेला, आझमचा मुख्य शिष्य ओसामा बिन लादेन होता. त्याचबरोबर लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सयीद, जयशे मोहम्मदचा अझहर मसूद हेसुद्धा आझमच्या तत्त्वज्ञानाने इस्लामिक दहशतवादी झाले. वहाब्बी इस्लाम स्वीकारणार्‍या टोळ्यांनी वहाब्बी इस्लाम न स्वीकारणार्‍या मुस्लीम व मुस्लीम नसलेल्या लोकांना शत्रू मानले आहे, जसे सौदी अरेबिया शिय्या मुसलमानांना आपला प्रथम शत्रू मानते. सौदी अरेबियाच्या दबावामुळे तत्कालीन पाकचा हुकूमशहा जनरल झिया उल हकने अधिकृतपणे पाकिस्तानला वहाब्बी इस्लामिक राष्ट्र बनवले. तेव्हापासून आजपर्यंत इसिस सकट सर्व टोळ्यांनी वहाब्बी इस्लाम अधिकृत धर्म पाळला आहे. तेव्हापासून जगातील दहशतवादाचा संदर्भ बदलत गेला. काश्मीरचा दहशतवाद हा त्याच धरतीवर 4 टप्प्यांत बदलत गेला. पहिला टप्पा 1987 साली मुस्लीम णछखढएऊ ऋठजछढ अशी राजकीय आघाडी काश्मीरमध्ये निर्माण झाली व निवडणूक लढवली. आमच्या डोळ्यादेखत त्या निवडणुकीत फारुख अब्दुल्लाने बहुतेक मतदान केंद्रे काबीज केली व घोटाळा करून सत्तेवर आले. सर्व कार्यकर्ते संतापले व जम्मू-काश्मीर लीब्रेस्न फ्रंट(गघङऋ) च्या नेतृत्वाखाली आझादीचा नारा दिला. ते सर्व पाक व्याप्त काश्मीरमध्ये गेले. गघङऋ हा स्वतंत्र काश्मीर मागणारा प्रमुख गट होता. सुरुवातीला पाकने त्याला पुर्ण मदत केली. हत्यार व प्रशिक्षण दिले. अमेरिकन उख-चीसुद्धा प्रचंड मदत झाली. 1 ऑगस्ट, 1999 ला गघङऋ ने काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्ष जाहीर केला. ही आझादी चळवळ सर्वधर्मसमभाव व लोकशाहीवर आधारित स्वतंत्र काश्मीर निर्माण करण्यासाठी होती. पाकने गघङऋचे प्रमुख अमानुल्ला खानला आपले मुख्यालय मुज्जाफराबादला स्थापन करू दिले. 8 डिसेंबर 1990 ला रुब्या सय्यद तत्कालीन भारताचे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईदच्या मुलीला गघङऋने पळवले व ओलीस धरले. बापाने मुलीसाठी अनेक दहशतवाद्यांना सोडले. तेव्हापासून आझादी चळवळीला गती मिळाली.

अमानुल्ला खानच्या म्हणण्याप्रमाणे 1991 ला 60 ते 70 आतंकवादी गट तयार झाले. त्यात हिझबुल मुजाहिदीनसारखे अनेक गट धार्मिक कट्टरवादी होते. गघङऋ चे तत्वज्ञान हे धार्मिक गटांच्या विरोधात होते, व काश्मिरियतवर आधारीत होते. त्यात सर्व धर्मीय लोकांना समतेच्या आधारावर सामावून घेण्याचा सिद्धांत होता. 1990 ते 1992 मध्ये 2213 दहशतवादी मारले गेले, त्यात बहुसंख्य गघङऋ चे लोक होते. म्हणून गघङऋ कमकुवत पडत चालला व धार्मिक कट्टरवादी लोकांची शक्ती वाढत गेली. हिजबुल मुजाहिदीन (कणच्) हा काश्मीरचे विलीनीकरण पाकिस्तानमध्ये होण्यासाठी निर्माण झाला, म्हणून पाकिस्तानने गघङऋ ला बाजूला करून कणच ला पुढे आणण्यास सुरुवात केली इथून दुसरा टप्पा सुरू झाला तो म्हणजे काश्मीरला पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा. त्यावेळी मला प्रत्यक्ष अनेक पकडलेल्या गघङऋ आणि इखवान गटांच्या आतंकवाद्यानी सांगितले की,1990 पासून पाकने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना वहाब्बी इस्लाम स्वीकारण्यास जबरदस्ती करायला सुरुवात केली. गघङऋची माणसे फोडून कणच् मध्ये जोडण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे तर कणच् ने त्यांची माणसेसुद्धा मारली. 1992 पासून पाकिस्तानने अमानुल्ला खान व त्यांच्या पाठीराख्यांना पाक व्याप्त काश्मीरमध्ये येण्यास बंदी घातली. पाकने आपली पूर्ण शक्ती कणच् च्या पाठीमागे उभी केली. तोपर्यंत अफगाणिस्तानच्या युद्धातील गैरकाश्मीर लोक कणच् मध्ये भरती होण्यास सुरुवात झाली. सय्यद आली शह गिलानीने जाहीर केले की, इस्लाम भौगोलिक राष्ट्रवाद मनात नाही, म्हणून स्वतंत्र सेक्युलर काश्मिरी राष्ट्र हे धर्माविरुद्ध जाते. या सर्व घटनांचा परिणाम असा झाला की कणच् च्या धार्मिक कट्टरवादाला सुफी काश्मिरी मुसलमानांनी पूर्ण विरोध केला. याचवेळेला पाकिस्तान प्रणीत गटांनी हुर्रियत कॉन्फरन्स निर्माण केली. त्यात 26 गट होते. बाबरी मशीदच्या विध्वंसामुळे व त्यानंतरच्या दंगलीमुळे धार्मिक कट्टरवादी गटांची शक्ती वाढत चालली. याचदरम्यान आम्ही तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकारामुळे अनेक दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण करून भारतात आणले व काश्मीरमध्ये दहशतवादाला सुरुंग लावले.
ब्रिगेडिअर सुधीर सांवत – 9987714929