काश्मीर खोऱ्यात २५० पेक्षा अधिक दहशतवादी सक्रीय; सुरक्षा व्यवस्थेत वाढ

0

श्रीनगर – काश्मीर खोऱ्यात सुमारे ३०० दहशतवादी सक्रिय झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. २५० पेक्षा जास्त दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून लाँच पॅडमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भारतीय सैन्य दलाने सावध पवित्रा घेतला असून या भागामध्ये सैन्य तैनात करण्यात आले आहे.

दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय सैन्य तैनात करण्यात आल्याची माहिती लेफ्टनंट जनरल ए. के. भट यांनी सांगितले. काश्मीर खोऱ्यात असलेल्या गावातील लोकांचाही भारतीय सैन्याला पाठींबा आहे. त्यामुळे या भागातील दहशतवादाचा आम्ही पूर्णपणे नाश करू, असेही भट म्हणाले. स्थानिक निवडणुका व्यवस्थित पार पडाव्यात म्हणून पोलीस आणि ‘केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्स’ प्रयत्न करत आहेत.

याठिकाणी होणाऱ्या स्थानिक निवडणुका शांततेत पार पाडण्याचा आमचा हेतू असल्याचेही भट म्हणाले. त्यासाठी पोलीस आणि केंद्रीय रिझर्व पोलीस रात्रं-दिवस प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. येत्या ८ ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीरमधील ४ नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे.