मुंबई: दिल्लीमधील जेएनयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचारानंतर मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर करण्यात आलेल्या आंदोलनात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारे पोस्टर झळकावण्यात आले. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनेवर देखील यावरून टीका झाली. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावरून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याची मागणी केली तर सहन केली जाणार नाही अशा शब्दात स्वतंत्र काश्मीरची मागणी करणाऱ्यांना खडसावले.
जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच निषेध करताना संजय राऊत यांनी रात्रीच्या अंधारात चोर, दहशतवादी आणि दरोडेखोर जातात अशा शब्दांत टीका केली. तसंच गेट वे ऑफ इंडिया येथून विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नसून त्यांची आंदोलनाची जागा फक्त बदलली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.