काश्मीर विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा

0

नॅशनल कॉन्फरन्सचे अकबर लोन कृत्य

श्रीनगर : काश्मीरच्या विधानसभेत नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्यामुळे मोठ वादळ उठले आहे. सभागृहाचे कामकाज सुरु असताना भाजपचे काही आमदार सभागृहात पाकिस्तानविरोधी घोषणा देत होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. या घटनेमुळे खळबळ माजली असून, आमदार अकबर लोन यांच्या या कृत्यानंतर पक्षानेही अंग काढून घेतले आहे.

पक्षाला द्वीराष्ट्राचा सिद्धांत अमान्य
या घटनेविषयी बोलताना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते जुनैद अझिम मट्टू यांनी सांगितले की, लोन यांचे वक्तव्य कदापि खपवून घेण्यासारखे नाही. मी याविषयी आमच्या पक्षाचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्याशीही बोललो. त्यामुळे आमच्या पक्षातील कोणीही अकबर लोन यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. नॅशनल कॉन्फरन्स पक्षाला द्वीराष्ट्राचा सिद्धांत मान्य नाही, ही बाब लोन यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे होती, असे ट्विट अझिम मट्टू यांनी केले.

कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही
या घटनेनंतर अकबल लोन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे कबुल केले. मात्र, हा माझा वैयक्तिक निर्णय होता. मी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याने इतर कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, नॅशनल कॉन्फरन्सने लोन यांच्या वक्तव्यानंतर या वादातून अंग बाजूला काढून घेतले.