कासमवाडीत विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

0

जळगाव – शहरातील कासमवाडी परिसरात सोमवारी पहाटे ४.१५ वाजता परिसरातच राहणाऱ्या तरुणाने विधवा महिलेचा विनयभंग केला. तसेच तीच्या नातेवाईकांना शिवीगाळ केली. या प्रकरणी विधेवा महिलेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीचे निधन झाल्यामुळे संबधित विधवा महिला सासु-सासरे व दोन मुलांसह कासमवाडी परिसरात राहते. सोमवारी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास कब्रस्थानाजवळील सार्वजनिक शौचालयात जात असताना परिसरात राहणाऱ्या संदीप दिनकर भारंबे या तरुणाने तीचा विनयभंग केला. महिलेने आरडा-ओरड केल्यानंतर तीचे नातेवाईक गोळा झाले होते. संदीप याने त्यांनाही शिवीगाळ केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.