यावल- तालुक्यातील कासवा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला विनोद तायडे यांच्याविरुद्ध उपसरपंचासह दहा सदस्यांनी यावल तहसीलदार कार्यालयात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या अविश्वास ठरावावर 16 नोव्हेंबर रोजी कासवा ग्रामपंचायतीमध्ये सकाळी अकरा वाजता तहसीलदार कुंदन हिरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत सुनावणी होणार आहे. कासवा ग्रामपंचायतीच्या सरपंच मनमानी कारभार करतात, सभासदांना विश्वासात घेत नाहीत, विकासकामांना अडथळा आणतात अशा विविध कारणांवरून कासवा ग्रामपंचायतीचे उपसरपंच पंढरी बारकू कोळी, ग्रामपंचायत सदस्य कल्पना प्रकाश कोळी, मीना संजय तायडे, संगीता जयेश कोळी, आशाबाई शंकर सपकाळे, पुनम गोपाळ तायडे, सुधाकर रामा कोळी, सविता प्रशांत सावळे, दशरथ अर्जुन सपकाळे, अजित गोकुळ पाटील या दहा सदस्यांनी अविश्वास दाखल केला आहे.