कासारवाडी – पुणे मेट्रोचे पिंपरी ते दापोडी दरम्यानच्या मार्गावरील काम वेगाने सुरु आहे. कासारवाडी येथे नाशिकफाट्याजवळ मेट्रोचे काम सोमवारपासून सुरु होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई महामार्गावरून कासारवाडी, सांगवी, पिंपळे गुरवकडे जाणारी दुचाकी, हलकी चारचाकी वाहने व पीएमपीएमएल बसेस यांनी सेवा रस्त्याचा वापर करावा. इतर सर्व वाहनांनी सँडविक कंपनीजवळील मर्ज इन होऊन ग्रेडसेपरेटर रस्त्याचा वापर करावा.
तसेच रहदारीस अडथळा होऊ नये म्हणून पुणे-मुंबई महामार्गावरील सँडविक कंपनी ते सांगवी, पिंपळे गुरवकडे नाशिक फाटा येथील अप रॅम्प पर्यंत सेवा रस्त्यावर नागरिकांनी वाहने पार्क करू नयेत, असे आवाहन वाहतूक विभाग व महामेट्रोच्यावतीने करण्यात आले आहे.