पिंपरी : एसटी बसला मोटार अडवी लावून मोटार चालकाने बस चालकाला खाली खेचून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच वाहक महिलेला व प्रवाशांनाही शिवीगाळ केल्याची घटना कासारवाडी येथील सँडविक कंपनीसमोर घडली. याप्रकरणी हनुमान पवळ (वय 34, रा. चर्होली) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात मोटार चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पवळ हे आळेफाटा ते शिवाजीनगर ही एसटी बस घेऊन शिवाजीनगरकडे जात असताना कासारवाडी येथे एका मोटार चालकाने मोटार अडवी लावून बंस थांबविली. तसेच चालक पवळ यांना बसमधून खाली ओढत शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच महिला वाहक मीरा चव्हाण व प्रवाशांनाही शिवीगाळ केली. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.