कासारवाडीत होणार मैदान

0

कासारवाडीः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने कासारवाडीमध्ये विविध खेळांसाठी मैदान विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर फुटबॉल, कबड्डी, क्रीकेट, नेट प्रॅक्टिस, लहान मुलांचे मैदान तसेच जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी योगा हॉल, बॅडमिंटन हॉल आणि व्यायाम शाळा उपलब्ध असणार आहे. या कामासाठी एकुण 13 कोटी 50 लाख 429 रुपये खर्च अपेक्षित असून या नियोजित क्रीडा संकुलामुळे परिसरातील खेळाडूंची मैदानाची गरज पूर्ण होणार आहे. यामुळे उत्तम खेळाडु तयार होण्यास मदत होणार आहे. तरुणांसोबतच जेष्ठांना व महिलांना जॉगिंग ट्रॅकचा लाभ घेता येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळाचे स्वतंत्र मैदान असणार आहे. स्टेडीयममध्ये फुटबॉलचे मुख्य मैदान असणार आहे. स्टेडीयम च्या तळमजल्यावर स्वागत कक्ष, लॉकर्स व स्वच्छता गृह तसेच व्यायाम शाळा, इनडोअर गेम्स हॉल व महिला वर्गासाठी योगा हॉल असणार आहे.