भडगाव प्रतिनिधी। येथे कासार समाजातर्फे आरक्षणासह विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे व तहसीलदार सी.एम.वाघ यांना देण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यात शासकीय नोंदीनुसार कासार समाज वर्गात अ.क्र.८७ वर आहे बदलत्या जिवनशैलित आरक्षणाचे निकष बदलणे व पुनरावलोकन होणे क्रमप्राप्त आहे. एकजात ८७ वर तर, दुसरी पोटजात एनटी बी-२८ वर हा विरोधाभास विचारात घेणे गरजेचे आहे. समाजाचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय मागासलेपण विचारात घेऊन कासार समाजास एनटी बी मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर कासार समाज अध्यक्ष संजय कासार, उपाध्यक्ष सुनील कासार, दीपक कासार, राजेंद्र कासार, प्रमोद कासार, भगवान कासार, सुरेश कासार, विनोद गोरे, भास्कर कासार, प्रसाद कासार, गणेश कासार, रमेश कासार, मधुकर कासार, दीपक कानडे, केशव कासार, सतीश कासार, डॉ.मयूर कासार, अक्षय कासार, राहुल कासार, मंगेश कासार यांच्यासह सर्व समाज बांधवांच्या स्वाक्षर्या आहेत..