कासोदा । येथील हाजी एन.एम. सैय्यद उर्दू हायस्कुलमध्ये नुकतेच सत्कार, निरोप व बक्षिस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाने अध्यक्ष हाजी अब्दुल गफ्फार मलिक हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मंगलाबाई भिमराव राक्षे सरपंच ग्रामपंचायत कासोदा यांनी दिपप्रज्वलन केले. झेडपीत नवनिर्वाचित जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, पं.स. सभापती रंजना सोनवणे, पं.स. सदस्या रेशमाबी शकील खान यांसह अन्य मान्यवरांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तर येथील शाळेतील उपशिक्षक रोशन अली सफदर अली यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नरेंद्र पाटील, संजय नवाब, संजय चौधरी, नुरुद्दीन मुल्लाजी, सलाउद्दीन अलाउद्दीन, सैय्यद अफसर अली, समद कुरेशी, मुख्तार खान, जुल्फीकार अली, शे. मुख्तार पंजाबी, शकील खान, हाजी याकुब मन्यार, अन्वर मिस्तरी, हाजी हमीद काझी, मुजफ्फर अली, अण्णा मिस्तरी, महानंदा पाटील, आदी प्रमुख अतिथींसह संस्थेचे चेअरमन हाजी हमीद अली, सेक्रेटरी हाजी तय्यब अली, गावातील प्रतिष्ठीत नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शेख शेख नुरुद्दीन तर सुत्रसंचालन सैय्यद सत्तार तर आभार शे. नुरुद्दीन यांनी व्यक्त केले.