कासोदा येथील राजाभाऊ मंत्री पतसंस्थेला पुरस्कार

0

कासोदा । येथील राजाभाऊ मंत्री ग्रा. बि. शेती. सह. पतसंस्था मर्या. कासोदा या संस्थेला स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र (पतसंस्था) या विभागातून उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला असून संस्थेच्या स्वच्छा कारभार, 14 टक्के प्रोरेटा पद्धतीने लाभांश देणारी पहिली पतसंस्था असल्याने, चढत्या क्रमाने विक्रमी नफा, संस्थेचे नेट एनपीए 0 टक्के असल्याने चांगले सामाजिक उपक्रम राबविले असल्याने 100 टक्के संगणकीकरण, संस्थेची स्वत:ची भव्य दुमजली इमारत सतत सर्व प्रकारचे कर्ज वाटप सतत सहा वर्षापासून ऑडीट वर्ग ‘अ’ संस्थेचे रौप्य महोत्सव वर्ष, असल्याने सदरच्या पुरस्कार संस्थेला मिळाला आहे.
सहकार भारती- देवगिरी संभाग आणि सहकार सुगंध आयोजित सहकार संयम राज्यव्यापी प्रतिबिंब वार्षिक अहवाल स्पर्धा – 2016 च्या पारितोषिक वितरण समारंभ नुकताच औरंगाबाद येेथे विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ना. सुभाष देशमुख, सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री हे होते. सदर पुरस्कार संस्थेचे चेअरमन जयप्रकाश समदाणी, व्हा. चेअरमन दिपक पाटील, व्यवस्थापक संजीव नवाल, संचालक किशोर मंत्री, राजेंद्र वाणी, दादु भोई, गोकुळ शिंपी, पांडुरंग वाणी, जगन्नाथ सोनवणे, सलाउद्दीन दादा, धामणे काका, संजय चौधरी यांचे उपस्थितीत देण्यात आहे.