कासोदा येथे एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

0

एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथे एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज शेख यांनी दिली आहे. मंगळवारी कासोदा येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला होता. बुधवारी त्यांच्याच परिवारात नवीन चार जण कोरोना बाधित झाले आहेत. मंगळवारी आढळून आलेले रुग्ण हे आमडदे‌ येथे जिल्हा बँक शाखेत कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. ते नुकतेच पातोंडे तालुका चाळीसगाव येथे उत्तर कार्याला गेले होते, तेथे ते नातेवाईकांना भेटले. त्यामुळे २५ ते ३० जणांच्या संपर्कात ते आल्याचे सांगण्यात आले.