कासोदा : येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवडे गट)ची जाहीर सभेचे आयोजन रविवार 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता भिमनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय समाजिक राज्यमंत्री यांचे आदेशाने उत्तर महाराष्ट्र प्रमुख रमेश मकासरे, जिल्हा अध्यक्ष आनंद बाविस्कर, जळगाव लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद सरात, जळगाव विभागीय अध्यक्ष दीपक सपकाळे, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, भडगाव तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, धिरज सोनवणे, एरंडोल-पारोळा क्षेत्र प्रमुख श्री.कापडणे उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी फरकांडे, नांदखुर्दे, कासोदा या ठिकाणी शाखा उद्घाटन, फलक अनावरणचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी कार्यक्रमाला बहुसंख्याने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रविण बाविस्कर यांनी केले आहे.