एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथील गुप्तधनाच्या चोरी प्रकरणात आठ संशयीतांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
गुप्तधन लांबवताच फुटले बिंग
तालुक्यातील कासोदा येथे 21 जानेवारी रोजी स्वातंत्र्य सैनिक स्व. गणपती समदाणी यांच्या पडीत घराच्या भिंतीत गुप्तधन सापडले होते. हे गुप्तधन नियमानुसार शासनाकडे जमा करण्याऐवजी यातील काही भाग हा लंपास करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनला मधुकर भागीरथ समदानी (72), युगल कैलास समदानी (28), जितेंद्र बिरबल यादव (26), ज्ञानेश्वर संतोष मराठे (60), संजय ऊर्फ सतीश साहेबराव पाटील (33), राहुल राजू भील (26), लहू दिलीप पाटील (26), स्वप्निल शांताराम पाटील (33, सर्व रा.कासोदा) या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व संशयितांना बुधवारी सकाळी अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.