कासोद्यातील तरुणाला 17 हजारांचा गंडा : अश्लील मॅसेजद्वारे ब्लॅकमेलिंग

एरंडोल : तालुक्यातील कासोदा येथील 31 वर्षीय तरुणाला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 17 हजार रुपये ऑनलाईन उकळण्यात आले मात्र त्यानंतर संबंधितांनी पैसे मागितल्याने तरुणाने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतल्याने अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्लॅकमेल करणार्‍यांची टोळी कार्यरत
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील 31 वर्षीय तरुण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. फेब्रुवारी 2021 ते 8 जून 2022 दरम्यान त्यांना अनोळखी नंबरवरून अश्लिल मॅसेज व अर्धनग्न पाठवून चॅटींग करण्यात आले. तरुणाच्या मोबाईलवर खून केलेले, रक्तबंबाळ असलेले व्हिडीओ पाठवून तुझादेखील खून करून मृत्यू घडवेल, अशी धमकी देण्यात आली. या धमकीला घाबरून तरुणाने दिलेल्या फोन पे नंबरवरून दोन हजार आणि 15 हजार असे एकूण 17 हजार रुपये पाठविले. पैसे दिल्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीला कंटाळून तरूणाने थेट गुरूवार, 9 जून रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.