कासोद्यातून भर दिवसा सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास !

One and a half lakhs instead of gold and silver ornaments from Kasoda all day long! कासोदा : शेतकरी कुटूंबासह शेतावर गेल्याची संधी चोरट्यांनी शेतकर्‍याच्या दारावर दस्तक देत सुमारे दिड लाखांचा ऐवज लांबवला. भर दिवसा ही घरफोडी कासोदो गावात घडली. या घटनेने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घर चोरट्यांसाठी पर्वणी
कासोदा गावातील साईपार्कमधील रहिवासी भागवत त्र्यंबक चौधरी शुक्रवारी सकाळी घराला कुलूप लावून पत्नीसह शेतात कापूस वेचणीसाठी गेल्यानतर चोरट्यांनी सकाळी साडेआठ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, बॅगमधील सात हजारांची रोकड व कापसाचे दोन बोथे असा एकूण सुमारे एक लाख ५८ हजार ७७० रुपयांचा ऐवज लांबवला.

कासोदा पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध
भागवत चौधरी सायंकाळी शेतातून घरी आल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आढळून आले. कपाट उघडे व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. चोरी झाल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी कासोदा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक नीता कायटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सहदेव घुले, इम्रान पठाण, समाधान तोंडे, प्रवीण हटकर तपास करीत आहेत.