कासोद्यात कडकडीत बंद

0

कासोदा । मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात कायगाव टोका येथील काकासाहेब शिंदे यांनी जलसमाधी घेतल्याच्या घटनेनंतर या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाच्या निषेधार्थ कासोदा शहरात मराठा महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ,छावा संघटना,आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी 25 जुलै 2018 ोजी कासोदा शहर शांतेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले. या बंदला कासोद्यातील किराणा दुकानदार, टपरी दुकाने, ठेलेवाले, हात लोटगाडी, पान टपरीवाल्यांनी कडकडीत बंद पाळला. याप्रसंगी मराठा सेवा संघ शहराध्यक्ष कैलास पाटील, छावा संघटनेचे शहराध्यक्ष अनिल शितोळे, तालुकाध्यक्ष उमेश पाटील, मराठा क्रांती मोर्चाचे तालुकाध्यक्ष बापूराव पाटील, मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, दिनेश पाटील, चेतन पाटील, नरेश ठाकरे, सुनिल परदेशी, अशोक पाटील, दिपक शितोळे आदींनी शहर बंदचे आवाहन केले. दरम्यान व्यापारी बांधवांनी आवाहानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यवसाय बंद ठेवला सपोनि संदिप पाटील, पोलिस उपनिरीक्षक नरेश ठाकरे, मिलींद कुमावत, पो.कॉ. जगदीश कोळंबे यांच्यासह पोलिसांचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.