कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची चाळीसगावात बैठक

0

चाळीसगाव। कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ यांची बैठक 17 रोजी नाशिक येथे उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक अ‍ॅड. एल.आर. घोडके यांच्या दालनात कॉस्ट्राईब महासंघ नाशिक विभागीय अध्यक्ष दिपक पाळंदे तसेच विभागीय कार्याध्यक्ष प्रभाकर पारवे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली. याप्रसंगी मागासवर्गीय व मागासवर्गीय तर यांच्या भरती, पदोन्नती, तसेच वर्ग 2, 3, 4 या कर्मचारी यांच्या संमस्येविषय चर्चा करण्यत आली व मेडीकल बील मंजूरी विषयी सखोल चर्चा झाली.

अति. सरचीणीस रमेश निकम जिल्हाध्यक्ष सुभाष पगारे, शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव महेश अहिरे, लक्ष्मीकांत सोनार, जि.प.अध्यक्ष व आनंद सपकाळ, संत कांबळे, सुनिल गीते, पगारे, विजय शिर्के, महेश जाधव, श्रीमती गजभिये, महेश ठाकरे, श्री गवळी, धर्मराज बच्छाव आदी उपस्थित होते.