काही तरी बिनसलं…कॉंग्रेस, राष्ट्रवादीची बैठक अचानक रद्द!

0

मुंबई: राज्यातील सत्ता संघर्ष अधिकच वाढत चालला आहे. शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी मिळून सत्ता स्थापन होणार असल्याची चर्चा आहे. तसे प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होत आहे. मात्र तिन्ही पक्षातील ठोस बोलणी अद्याप होऊ शकले नसल्याने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालेला नाही. दरम्यान आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ती बैठक रद्द झाल्याने, राजकारणाला पुन्हा वेगळे वळण लागले आहे.

राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसमध्ये काहीतरी बिनसले कि काय? असा सवाल उपस्थित होत आहे. अजित पवारांनी स्वत: याबाबत माहिती दिली. मात्र यावेळी त्यांचा चेहरा कमालीचा नाराज दिसल्याने चर्चेला उत आले आहे. बारामतीला जात असल्याचे सांगत अजित पवार यांनी बोलणे टाळले.