काही तासांमध्ये जळगावात होणार भरित बनिवण्याचा विश्वविक्रम

0

वांग्यांच्या माळा टाकून केले मान्यवरांचे स्वागत

जळगाव – मराठी प्रतिष्ठानतर्फे आयोजित विश्वविक्रमी भरीत बनवण्याच्या प्रक्रियेला पहाटे साडेचार वाजेपासून सुरुवात झाली आहे. काही तासांमध्ये २५०० किलोपेक्षा जास्त भरीत बनविण्याचा विश्वविक्रम जळगावात नोंदविला जाणार आहे .
भरीत महोत्सवाच्या या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके, तसेच प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल कामत हे उपस्थित आहेत .उपस्थित सर्व मान्यवरांचे मराठी प्रतिष्ठानच्या वतीने वांग्यांच्या माळा टाकून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात झाले.

प्रसिद्ध शेफ मनोहर विष्णू यांच्या पाच जणांच्या टीमसह जळगावातील
१२५ जण पहाटेपासून भरीत बनविण्याच्या कामाला लागले आहेत . ढोल ताशांचा गजर अशा उत्साहपुर्ण वातावरणात नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे.

सविस्तर वृत्त लवकरच