कल्याण :कल्याण पूर्वकडील पिसवली ज्ञानदीप कॉलनी परिसरात राहणारे रजनीकांत शाहू यांचे चेतना शाळेच्या बाजूला रजनीकांत पतंजली इंटरप्रायझेस च्या नावाने आयुर्वेदिक चे दुकाना आहे
.काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दुकानात उंदीर मेल्याचे दिसल्याने या उंदराला बाहेर फेकण्यासाठी गेले असता हि संधी साधत अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख रक्कम 27 हजार 700 रुपये चोरून पळ काढला .दुकानातील रोकड चोरी झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी शाहू यांनि कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनि अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .