काहूरखेडा, टहाकळी येथील विद्यार्थी घेणार ई-लर्नींगने शिक्षण

0

वरणगाव । येथून जवळच असलेल्या काहुरखेडा व टहाकळी येथील शिक्षकांनी शाळा डीजीटल करत पुढचे पाऊल उचलून विद्यार्थ्यांना ई लर्नींग ने शिक्षण देणार आहेत. या वर्गाचे उद्घाटन शुक्रवार 11 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत शिक्षण परिषद झाली. यावेळी वरणगाव बीट अंतर्गत वरणगाव व आचेगाव केंद्रातील जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील शिक्षक उपस्थित होते

विद्यार्थी येणार शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
जिल्हा परिषद शाळांनी कात टाकली असुन शिक्षण क्षेत्रातील नवनविन आव्हाने स्विकारत आहेत. खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतरत येथील शिक्षकांनी गावकर्‍यांच्या मदतीने व शासकीय अनुदानातून शाळेेत डीजीटल वर्ग सुरु केला असुन ई लर्नींग संकल्पना येथे राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेतून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाचा लळा लागत अमुर्त कल्पना मुर्त होणार आहेत. या वर्गाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेला झाली. तसेच यावेळी वरणगाव बीट अंतर्गत वरणगाव व आचेगांव केंद्राअंतर्गत येणार्‍या जिल्हा परिषद व माध्यमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यांपकांसाठी एक दिवसीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत शाळा सिध्दी या विषयावर सुनिल वानखेडे, मीरा जंगले, विलास तायडे बोलणार असुन प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व डीजिटल शाळा, प्रगत विद्यार्थी, प्रगत शाळा या विषयावर ज्योती बेलसरे, पायाभूत चाचणी या विषयावर विनय भोगे, गणित प्रगल्भीकरण विषयावर राजाराम कोकाटे हे मार्गदर्शन करणार आहेत. विविध शासकीय परिपत्रकांचे वाचन व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.