जळगाव: काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयात नुकतेच विज्ञान मंडळाचे उद्घाटन झाले़ याप्रसंगी लोक शिक्षण मंडळाचे चिटणीस अवधूत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती़ दरम्यान, या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी मी रोबोट झालो तर या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली.
यात मिनाक्षी जगताप हिने प्रथम तर सुप्रिया दुबे हिने दुसरा क्रमांक मिळविला़ त्यानंतर मोबाईचे दुष्परिणाम या विषयावर वकृत्व स्पर्धा घेण्यात आली़ त्यात प्राची पाटील हे प्रथम तर निकिता भोईटे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला़ मुख्याध्यापिका जे़आरग़ोसावी यांनी अध्यक्षीय भाषणात मोबाईलचा योग्य वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले़ यावेळी बी़एस़राणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.