वॉशिंग्टन | सेल्फी हा समकालीन समाजातील फोटो काढण्यासाठी सर्वात आवडता मार्ग बनलेला आहे. कुणीतरी समोरून फोटो काढतोय हे दृश्यच विरळ झालंय. अखेर सेल्फीची इतकी आवड माणसाला का, आणि स्वतःचा स्वतः पहाणं इतरांनी आपल्याला पहाण्यापेक्षा वेगळं कसं ही जिज्ञासा तुम्हाला आहे का. लंडन विद्यापीठातील न्युरोसायन्टिस्ट जेम्स किल्नर याला हे प्रश्न आपल्या सर्वांना विचारावेसे वाटलंय.
आपण आपला जास्तीत जास्त वेळ इतरांचे अवलोकन करण्यात आणि त्यांच्या विषयी बोलण्यात घालवतो. इतरांचे चेहेरे त्यावरील भाव आपण पहातो. ते सामाजिक संवादासाठी आवश्यकही आहे. इतकं सगळं केलं की आपण इतरांची पारख चांगलीच करू शकतो हे ओघानं आलंच. मात्र आपण स्वतःकडे किती पहातो, हा प्रश्न विचारलाच पाहिजे.
आपलं स्वतःच आपल्याबद्दलच मत आपण आपल्या भावनांवरून बनवतो. भावना चेहेऱ्यावर उमटतात. पण दुसऱ्यांच्या भावना चेहेऱ्यावरून पाहणाऱ्या आपल्याला स्वतःचा चेहेरा पहाता येणं शक्य नसतं. समजा आपला फोटो कुणी काढला आणि दाखवून म्हटलं की या फोटोसारखी एक्सप्रेशन दे तर ती देता येत नाहीत. कुणी काढलेल्या फोटोत आपण अनवधानाने कृत्रिमच बनतो. जेम्स किल्नर म्हणतो आपण आपल्याला खरं खुरं पहायचं असलं तर सेल्फीनेच ते शक्य होतं. लोकांना सेल्फी फोटो आवडतो कारण आपण खरे खुरे त्यातच असतो दुसऱ्याने काढलेल्या फोटोत नसतो.