किंग्स इलेव्हनची धुरा मॅक्सवेलकडे

0

नवी दिल्ली । इंडियन प्रीमिअर लीग’च्या (आयपीएल) आगामी दहाव्या मोसमाला पाच एप्रिलपासून सुरवात होत आहे. या दहाव्या मोसमासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे कर्णधारपद कंगारूचा ग्लेन मॅक्सवेलकडे सोपविण्यात आले . गेल्या मोसमात पंजाबच्या संघाचे नेतृत्व डेव्हिड मिलरकडे सोपविले होते,मात्र सहा सामन्यांनंतर मिलरला वगळून मुरली विजयला कर्णधारपदी नियुक्त केले होते.त्यामुळे या मोसमात पंजाब संघाचे नेतृत्व ग्लेनकडे कुठपर्यंत राहते हे पाहवावे लागले.

दोन कर्णधार बदलूनही संघाला यश नाही
इंडियन प्रीमिअर लीग’च्या 9 मोसमात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने दोन कर्णधार बदलूनही संघाला यश मिळले नव्हते . पंजाब सलग आठ व नऊ या मोसमात शेवटच्या स्थानी होता.त्यामुळे यंदा पंजाबने संघात आमूलाग्र बदल करण्याचे ठरविले आहे. वास्तविक पंजाबच्या संघात इऑन मॉर्गन आणि डॅरेन सॅमीसारखे आंतरराष्ट्रीय संघांचे अनुभवी कर्णधार आहेत; तरीही त्यांनी मॅक्सवेलकडे नेतृत्व सोपविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत मॅक्सवेलने कधीही कुठल्याही संघाचे नेतृत्व केलेले नाही.

किंग्ज इलेव्हन पंजाब संघ
वरुण ऍरॉन, हाशिम आमला, अनुरित सिंग, अरमान जाफर, के. सी. करिअप्पा, मार्टिन गुप्टील, गुरकीरतसिंग मान, मॅट हेन्री, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल (कर्णधार), डेव्हिड मिलर, इऑन मॉर्गन, निखिल नाईक, टी. नटराजन, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा, प्रदीप साहू, डॅरेन सॅमी, संदीप शर्मा, मोहित शर्मा, रिंकू सिंग, मार्कस स्टॉईनिस, स्वप्निल सिंग, राहुल तेवाटिया, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.