भुसावळ । जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी शुक्रवारी सकाळपासून साकरी, खंडाळा, मोंढाळा व कुर्हे पानाचे येथील शाळांना भेटी देत पाहाणी केली त्यांना हे धान्य खराब झाले असल्याचे आढळून आले. पोषण धान्यात किड आढळून आल्यामुळे बालकांचे आरोग्य धोक्यात सापडल्याचे दिसून येते. साकरी येथे वाटाण्याला कीड आढळून आली. खंडाळा येथे तुर डाळीला किड होती, मोंढाळा येथे तांदुळात धोनोर होते , कुर्हा पानाचे येथील तूर व मसुर डाळ खराबच आहे.
तीन तालुक्यांची होणार चौकशी
भुसावळ, धरणगाव, चोपडा तालुक्यात निकृष्ट पोषण आहार पुरवठा होत असल्याची तक्रार आहे. माधुरी अत्तरदे, पल्लवी सावकारे यांनी सीईओंकडे तक्रार केली. पोषण आहार धान्याचे नमुने त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आणले होते.सीईओंनी चौकशीचे आदेश दिले जिल्हाभरात चौकशी होणार आहे. प्रत्येक गोणीमागे पाच किलो धान्याचा पुरवठा कमी होत असल्याची तक्रार माधुरी अत्तरदे यांनी केली. शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी निकृष्ट धान्य असल्याचे प्रमाणपत्र दिल्यास बील दिले जाणार नाही. पोषण आहारात डाळ तुरीचीे की मुगाची ; काही कळून येत नाही. डाळ ओळखुन दाखवा माझ्याकडून एक हजार रुपये बक्षीस देईल असे पल्लवी सावकारे यांनी सीईओ यांना सांगितले. प्रमोद सावकारे, नारायण कोळी, किरण चोपडे, नितीन पाटील, निर्मला कोळी, नंदकिशोर बडगुजर, माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र शिंदे उपस्थित होते.