कितकी म्हणते, ‘बिग बॉस’मध्ये एन्ट्रीची चर्चा केवळ अफवाच !

0

मराठी-‘बिग बॉस’ मराठीचे नवे पर्व लवकरच सुरू होणार. मात्र या पर्वात कोण-कोण सहभागी होणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची नावे यावेळी घेतली जात आहेत. त्यात अभिनेत्री केतकी माटेगावकर बिग बॉसच्या या सीझनमध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्टीकरण खुद्द केतकीने दिले आहे.

‘बिग बॉस’च्या नव्या सीझनमध्ये कोण कलाकार सहभागी होऊ शकतील याबद्दल सांगताना ‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या सीझनचा स्पर्धक अभिनेता पुष्कर जोग याने काही नावे सांगितली. गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांची नावे त्यात आघाडीवर होती. केतकीने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत तिची बाजू मांडली. ‘आपण सगळेच ‘बिग बॉस २’ ची आतुरतेने वाट पाहतोय. मला बिग बॉस पाहायला प्रचंड आवडते आणि तुमच्यासारखी मी पण सीझन २ ची वाट पाहते आहे. मी ‘बिग बॉस २’ मध्ये सहभागी होईन अशा चर्चा सध्या रंगल्या आहेत. परंतु, या सगळ्या केवळ अफवा आहेत.या सुपरहिट कार्यक्रमात या वर्षी तरी सहभागी होण्याचा माझा विचार नाही. ‘बिग बॉस’ सीझन २ च्या सगळ्या टीमला आणि स्पर्धकांना माझ्या तर्फे शुभेच्छा’ असे लिहून तिने या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.