किती बोलावे याचे विवेक असणे गरजेचे

0

जळगाव : भाषण कौशल्यासाठी शब्दसाठा, मुद्दे, क्रम, उच्चार, हावभाव, आवाजातील चढ उतार एवढेच फक्त महत्वाचे नाही तर यासोबतच केव्हा, काय व किती बोलायचे याचा विवेक असणेही गरजेचे असते. शाळा कॉलेज, सामाजिक संस्था यामधील उपक्रमात जेथे जेथे बोलण्याची संधी मिळेल ती सोडू नका. येथूनच खर्‍या अर्थाने आपले प्रात्यक्षिकातून भाषण कौशल्य विकसन होत असते, असे प्रतिपादन महेश गोरडे यांनी केले. एसडी-सीड अर्थात सुरेशदादा शैक्षणिक व उद्योजक विकास योजना (एसडी सीड) तर्फे नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित भाषण कौशल्याचा विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मागदर्शन करतांना बोलत होते.

कार्यक्रमाला नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. पी. पवार, डॉ. एस. डी. पाटील कॉमर्स विभाग प्रमुख प्रा. व्ही. एस. पवार, प्रा. राजेंद्र देशमुख, आर. एस. सोनवणे, बी.बी.पाटील, पी. आर. पाटील तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर एसडी सीड गेल्या आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या जीवनात एक आशेचा किरण निर्माण करीत आली आहे. आर्थिक कमकुवत परिस्थिती, कौटुंबिक आणि सामाजिक कल हाचे वातावरण अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना आपण एकटे आहोत अशा जाणीवेतून त्यांना हात देवून शिक्षण घेऊन क्षितीजापलीकडे जाण्याचे एक विद्यार्थी हिताचे काम संस्थे मार्फत राबविले जात आहे. दर वर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. आज पर्यंत 12000 हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला असून 2700 विद्यार्थ्यांनी त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण केले आहे. शिष्यवृत्ती सोबतच विद्यार्थ्यांना क्लास फी मध्ये सवलत मिळवून देणे, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती देणे, विविध विषयावर परिसंवाद, भाषण आणि चर्चासत्रांचे आयोजन करणे, ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार करणे, विद्यार्थी आणि पालकांचे मेळावे घेणे, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे अशी अनेक कामे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने करण्याचा मानस आहे. त्याला सर्व स्तरातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती मार्गदर्शन करतांना एसडी सीड समन्वयक प्रवीण सोनावणे यांनी कार्यशाळेत दिली. उपक्रम यशस्वी होण्यासाठी नूतन मराठा कॉलेजचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख व विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हार्निग बोर्ड चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.