किनगावच्या केओएम इंग्लिश स्कुल मध्ये जागतिक आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

यावल ( प्रतिनिधी ) तालुक्यातील किनगाव येथील अमीर प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेव्दारे संचलित केओएम इंग्लिश मीडियम स्कूल येथे जागतिक आदिवासी दिवस विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळाआणि संस्थेचे कार्य अध्यक्ष तथा आदीवासी चळवळीतील युवा समाजसेवक सचिन तडवी सर, यांच्या हस्ते आदिवासी क्रांतिकारक वीर भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या आवारात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सचिन तडवी व अजित तडवी सर यांनी जागतिक आदिवासी दिना बद्दल आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करीत आदिवासी समाज बांधवांच्या विशिष्ठ संस्कृतीओळख,आस्तित्व,आत्म सन्मान कायम ठेवण्यासाठी व आदीवासींच्या न्याय व हक्क मिळवुन देण्यासाठी संघर्ष करून लढा देणाऱ्या थोर क्रांतीकारी आणी समाज सुधारक यांचे योगदान व जिवनाशी निगडित ऐतिहासिक शौर्य व बलीदांनाची माहीती यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना दिली. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गणेश मेश्राम सर,संपत पावरा सर, जयश्री चौधरी ,कालिमा तडवी ,मनिषा पावरा ,कविता महाजन व इतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आणी आदिवासी समाज बांधव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.