ग्रामपंचायतीच्या वर्तुळात खळबळ ; ग्रामविकास अधिकार्यांवर दाखल होता गुन्हा
यावल : यावल तालुक्यातील किनगावच्या महिला सरपंचांना 14 व्या वित्त आयोगातील निधीचा अपहार भोवला असून यावल पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. या निकालामुळे ग्रामपंचायतीच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. 27 नोव्हेंबर किनगावच्या महिला सरपंच ज्योती अशोक महाजन व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भास्कर चंद्रकांत टोकरे यांच्याविरुद्ध शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीचा तब्बल 19 लाख 25 हजार 20 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता हेदेखील विशेष !