किनगावजवळ अवैध दारू भट्टी उद्ध्वस्त ; 17 हजारांचा मुद्देमाल नष्ट

0

फैजपूर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाच्या कारवाईने खळबळ ; कारवाईत सातत्य राखण्याची अपेक्षा

यावल- तालुक्यातील किनगावजवळ आनंदा महाजन यांच्या शेताच्या बांधावर अवैधरीत्या गावठी भट्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर फैजपूर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून 16 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला तर यावेळी पोलिसांना पाहून संशयीत आरोपी हनीफ पटेल (किनगाव) हा पसार झाला. शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक हजार 750 रुपयांची गावठी रसायन, 14 हजार रुपये किंमतीचे गूळ मिश्रीत रसायन तसेच 850 रुपये किंमतीची 17 लिटर तयार गावठी दारू असा एकूण 16 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल उद्ध्वस्त केला. या प्रकरणी अलताफअली सैय्यद यांच्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अविनाश चौधरी, हवालदार दिलीप तायडे, अलताफअली सैय्यद, सुमित गोकुळ बाविस्कर आदींच्या पथकाने केली.