किनगावजवळ दुचाकीला व्हॅनची धडक ; दोघे दुचाकीस्वार जखमी

0

यावल- चिंचोली-किनगाव रस्त्यावरील किनगाव वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ महामार्गावरील खड्डयामुळे पुन्हा दुचाकी मारोती व्हॅन यांच्यात धडक होवून दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता घडली. जखमींना जळगाव येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावलकडून चोपड्याकडे जाणारी मारोती व्हॅन (एम.एच.19 ए.एक्स 9535) व चिंचोलीकडून किनगावकडे जाणारी दुचाकी (एम.एच.19 सी.एम.4212) यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार मयुर राजेंद्र काळे (27) व निलेश शरद पाठक (34) हे किरकोळ जखमी झाले. अपघात होताच ग्रामस्थांनी जखमींना तत्काळ जवळच असलेल्या किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिल पाटील यांनी जखमीवर उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हलवले.