किनगावला किरकोळ कारणावरून महिलेस मारहाण : तिघांविरोधात गुन्हा

यावल : तालुक्यातील किनगाव येथे ट्रॅक्टरखाली कोंबडी आल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी एका 30 वर्षीय महिलेस मारहाण केली. याबाबत यावल पोलिसात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. नजीमा आमद तडवी (30, किनगाव बुद्रुक, ता.यावल) यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची कोंबडी ट्रॅक्टर खाली आल्यानेा त्याचा त्यांनी जाब विचारला व त्याचा राग आल्याने मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजेला त्यांच्या घरासमोर साहिल मुबारक तडवी, मीनाबाई मुबारक तडवी, अल्ताफ मुबारक या तिघांनी तिला शिवीगाळ करीत चापटा-बुक्यांनी मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्यांची धमकी दिली. तिघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.