इंग्रजीच्या पेपराला कॉप्या ; भरारी पथकाची कारवाई
जळगाव:- दहावी इंग्रजीच्या पेपराला कॉप्या करणार्या सहा विद्यार्थ्यांना भरारी पथकाने डिबार करण्याची कारवाई गुरुवारी केल्याने कॉपी बहाद्दरांमध्ये खळबळ उडाली. किनगावच्या नेहरू माध्यमिक विद्यालयातील एक तर यावलच्या डॉ.जाकिर हुसेन उर्दू हायस्कूलमधील तीन विद्यार्थ्यांना डाएटचे प्राचार्य गजानन पाटील यांनी डिबार केले. भुसावळ तालुक्यातील वराडीसीम येथील पंडित नेहरू हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना राज्य मंडळ सदस्य प्रा.शुभांगी दिनेश राठी यांनी डीबार केले.